September 19, 2025 8:45 am

पंचायत समिती, संगमनेर यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

संगमनेर प्रतिनिधी :पंचायत समिती, संगमनेर यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ यादरम्यान यशस्वीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला सिद्धिविनायक लॉन्स येथे आ. खताळ हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधत या अभियानाची उद्दिष्टे, भूमिका आणि जबाबदाऱ्या याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढवणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर गौरविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येईल. यासाठी संगमनेर तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबवले जाईल आणि आपला तालुका जिल्ह्यात व राज्यात अग्रेसर राहील, यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा.ना.श्री. जयकुमार गोरे साहेब, पालकमंत्री मा.ना.श्री

राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली हे अभियान नक्कीच यशस्वी होईल. या कार्यशाळेला शासकीय अधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें