September 19, 2025 8:36 am

आज भाद्रपद वद्य षष्ठी, १३ सप्टेंबर दिवशी ‘ज्ञानेश्वरी जयंती’

अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. यापैकी एक म्हणजे संत ज्ञानेश्वर . वयाच्या २१ व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली असली तरीही अल्प आयुष्यात त्यांनी केलेले काम आज जगाला प्रेरणा देत आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेचे रूपांतरण मराठी केले त्याला ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणून ओळखलं जातं. आज भाद्रपद वद्य षष्ठी, १३ सप्टेंबर रोजी ‘ज्ञानेश्वरी जयंती’ आहे.
दरम्यान ऐतिहासिक नोंदींनुसार, संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेवर भाष्य करण्यासाठी, त्यामधील बोध जनसामान्यांपर्यंत पोहचावा म्हणून रसाळ आणि मराठी भाषेत त्याची निर्मिती केली. तो ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला.नंतर त्याच्या अनेकांनी प्रती लिहल्या. मात्र त्यामध्ये चूका, शब्द, ओळी गाळनं अशा गोष्टी घडायला लागल्या. म्हणून संत एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुद्ध केला. ही प्रक्रिया पूर्ण झाली तो दिवस भाद्रपद वद्य षष्ठी चा होता. अशी नोंद आहे. त्यामुळे पुढे वारकरी बांधव दरवर्षी भाद्रपद वद्य षष्ठीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी करतात.
ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. पसायदान हे १८व्या अध्यायाचा एक भाग आहे. त्याने ज्ञानेश्वरीची सांगता होते. त्यामध्ये जगाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. दरम्यान त्यानिमित्ताने दरवर्षी नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रबोधनपर, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर जयंती साजरी केली जाते. सनातन धर्माची शिकवण आणि उपदेश सामान्यांपर्यंत पोहचवण्यसाठी संत ज्ञानेश्वर यांनी भरीव कामगिरी केली आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें