September 19, 2025 8:39 am

११ हजार जनावरांसाठी १ पशुधन अधिकारी धानोरे सोनगाव सात्रळ परिस्थिती

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

धानोरे : : राज्यात लम्पी स्कीन आजाराने पुन्हा डोकंवर काढलं आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा तसेच राहूरी तालुक्यालाही बसला आहे. परंतु या तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. धानोरे,सोनगाव, सात्रळ परिसरामध्ये जवळपास ११ हजारांच्या आसपास पशुधन आहे.

उपचारासाठी सोनगाव येथे पशु चिकित्सक केंद्र आहे. सध्या सोनगाव येथील केंद्रात पशुधन विकास अधिकारी नाहीत. त्यामुळे येथील केंद्राचा अतिरीक्त अधिभार कोल्हार खुर्द येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे आहे. या दोन्ही केंद्रांतर्गत सुमारे १० ते ११ गावे आहे. गावांमधील अंतरही जादा आहे. त्यामुळे केवळ एका अधिकाऱ्याला ही गावे संभाळताना नाकेनऊ येत आहे. याही परिस्थितीत येथील अनेक जनावरांचे लसीकरण झालेले आहे.

या दोन्ही पशुचिकित्सक केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप सातपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे सध्या कोल्हार येथील पशुचिकित्सक केंद्राचा चार्ज आहे.व सोनगाव येथील केंद्राचा अतिरीक्त चार्जही माझ्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे गोपालकांना सेवा देण्यात उशीर होत आहे. याही परिस्थितीत सेवा देण्याचे कार्य सुरू आहे.

सोनगाव येथील पशुचिकित्सक केंद्रात प्रशासनाने तातडीने पशुधन अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी या परिसरातील गोपालकांनी केलेली आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें