September 11, 2025 1:31 pm

राज्यात जीबीएसचा चौथा बळी! आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

जीबीएस हा आजार रुग्णांच्या जीवावर उठला असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जीबीएस आजारावर नियंत्रण मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जीबीएसच्या या १४० संशयित रुग्णांपैकी तब्बल ९८ जणांची जीबीएस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये मनपा क्षेत्रातील २६, मनपा क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील ७८, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १५, पुणे ग्रामीणमधील १० आणि इतर जिल्ह्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे

पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले १८ जीबीएस रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली. डॉ. कमलापूरकर म्हणाले की, ‘आरोग्य विभागाने जिल्ह्यातील जीबीएसग्रस्त भागात घरोघरी जाऊन पाहणी सुरू केली असून यामध्ये मनपामधील ४० हजार ४५७, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १० हजार ७१८ आणि पुणे ग्रामीण भागातील १२ हजार २९५ अशा एकूण ६३ हजार ४७० घरांचा समावेश आहे.

 

सोलापुरातील सीए असलेल्या ४० वर्षीय तरुणाचा जीबीएसने घेतला जीव.

 

-पुण्यात ससून रुग्णालयात उपचारादरम्यान ५६ वर्षीय जीबीएस महिला रुग्णाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ वर्षीय जीबीएस रुग्णाचा मृत्यू

– पुण्यातील नांदेड गावात ६० वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू

 

पुण्यातील गुइलेन-बॅरे सिंड्रोम रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने महापालिकेने नागरिकांना या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी आरोग्य विषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

– पिणारे पाणी सुरक्षित आहे याची खात्री करा.

 

– भाज्या आणि फळे काळजीपूर्वक धुवा.

 

– ताजे शिजवलेले आणि स्वच्छ घरगुती अन्न खा. जेव्हा शक्य असेल तेव्हा स्ट्रीट फूड किंवा उघडे, अस्वच्छ खाद्यपदार्थ खाणे टाळा.

 

– खाण्यापूर्वी कुक्कुटपालन आणि मांस पूर्णपणे शिजलेले आहे याची खात्री करा.

 

– कमी शिजवलेले किंवा कच्चे अन्न, विशेषत: अंडी आणि चिकन खाणे टाळा.

 

– वैयक्तिक स्वच्छता राखा.

 

-उद्रेकाच्या काळात भांडी किंवा अन्न सामायिक करणे टाळा.

 

– कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवा.

 

– कच्चे मांस हाताळल्यानंतर स्वयंपाकघरातील पृष्ठभाग आणि भांडी निर्जंतुक करा.

 

केंद्रीय पथक राज्याच्या आरोग्य विभागांशी जवळून काम करत आहे आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांची शिफारस करण्यासाठी जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेत आहे. पुणे शहराच्या विविध भागांतील एकूण १६० पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, आठ जलस्त्रोतांचे नमुने दूषित आढळले आहेत.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें