September 11, 2025 8:41 am

मूंग, मसूर, हरबार.कोणत्या डाळीत सर्वाधिक प्रोटीन

१०० ग्रॅम हरबरा डाळीत २८-३० ग्रॅम प्रोटीन असते. सर्वाधिक प्रोटीन असणारी ही डाळ आहे. ज्या लोकांना मसल्स गेन करायची आहेत, त्यांच्यासाठी ही डाळ सर्वोत्तम आहे. या डाळीत फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नीशियम मुबलक आहेत.त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले असते.

१०० ग्रॅम मूंग डाळीत जवळपास २४ ग्रॅम प्रोटीन असते. मूंग डाळ पचण्यासाठी चांगली आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही डाळ उत्तम आहे. यामध्ये फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स शरीरला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

१०० ग्रॅम मसूर डाळीत जवळपास २५ ग्रॅम प्रोटीन असते. या डाळीत प्रोटीन सोबत आयरन आणि फाइबर मुबलक असते. एनीमियाचा आजार असणाऱ्यांसाठी ही डाळ फायदेशीर आहे. आरोग्यासाठी ही डाळ चांगली आहे. कारण यामध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करते.

मसूर डाळ लोह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संतुलित आहार हवा असेल तर या सर्व डाळींचा आहारात समावेश करा आणि दररोज वेगवेगळ्या कडधान्याचा समावेश आहारात करा. यामुळे शरीराला सर्व पोषक तत्व मिळतील.

प्रोटीनचा विचार केल्यावर हरबारा डाळ सर्वात आघाडीवर आहे, कारण प्रत्येक १०० ग्रॅममध्ये सुमारे २८-३० ग्रॅम प्रथिने आढळतात. पण जर तुम्हाला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असेल तर मूग डाळ हा उत्तम पर्याय आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें