September 11, 2025 1:17 pm

देवळालीत बुधवारपासून खंडोबा यात्रौत्सव

राहुरी :शहाजी दिघे 

राहुरी : देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील नागरिकांचे कुलदैवत खंडोबा महाराज यात्रोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही बुधवार दि १२ फेब्रुवारी ते गुरुवार दि.१३ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. दोन दिवस चालणान्या या यात्रोत्सवात विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा व यात्रा उत्सव शांतेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित कदम यांनी केले आहे.

देवळाली प्रवराच्या समृध्द समाज जीवनाच्या विकासात अनेक रुढी, परंपरा, ऊपासना तसेच ग्रामदेवत कुलदेवताच्या भक्ती आराधनेचा मोठा सहभाग राहिलेला आहे. कुलदेवत असणाऱ्या म्हाळसाकांत मल्हारी म्हणजेच मार्तंड खंडोबा महराज देवळाली प्रवरा येथील जागृत देवस्थान, नेवासेकडून जेजुरीकडे जाताना खंडेराया म्हाळसोबत देवळवली तथा देवांची आळी अर्थात देवळाली प्रवराच्या दक्षिणेकडील खडकाळ भागावर मुकामी होते. अशी आख्यायिका आहे. या नुसार तो दिवस म्हणजे माघ पौर्णिमा तथा दांडी पोर्णिमस खंडोबा महराज यांचा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो.

देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील सर्व नागरिक कुठल्याही शुभमंगल कार्याची मुरुवात गणेशासोबत खंडोचा महाराज यांना वंदन करून करतात. या दिवशी घरोघरी. नव्या धान्याचा पुरणपोळीचा नैवेद्य खंडोबा महाराज यांना देण्यात येतो. यात्रेनिमित्त अनेक धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. बुधवार १२ फेब्रुवारी रोजी होम हवन, गंगास्नान, आभिषेक भव्य पालखी सोहळ्यात लेझीम, सनई, संवळ, डफ, चोपाड्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. संध्याकाळी छबिना मिरवणुकीत नामवंत ब्रास बॅन्ड पथकांची जुगलबंदी होणार आहे. रात्री सोलापूर, वांबोरी, अहिल्यानगर येथील शोभेच्या दारुकामाचा आतषबाजीचा सामना होईल. दुसऱ्या दिवशी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा होणार आहे. यामध्ये मल्हार केसरीच्या मानाच्या चांदित्या गदेच्या मानकरी होण्यासाठी अनेक नामवंत पहिलवान मैदानात उतारतात. अंतिम नेत्रदीपक व चिटपट कुस्ती करणाऱ्या पहिलवानाचा मल्हार केसरी हा मानाचा किताब व चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येतो. यानंतर रात्री ९ वाजता सुंदरी’ हा मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती देवळाली प्रवरा येथील गावाकऱ्यांनी दिली आहे. 

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें