September 11, 2025 1:17 pm

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापालिका यांच्या वतीने उड्डाणपूल परिसरात स्वच्छता अभियान

अहिल्यानगर :प्रतिनिधी 

अहिल्यानगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महापालिका यांच्या वतीने उड्डाणपूल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात सहभागी होत या अनोख्या उपक्रमात योगदान दिले. यापूर्वीही महापालिकेला शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण त्यांच्याकडून स्वच्छतेचा फक्त देखावा होत असल्याने शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे अभियान राबविले. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून त्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाखालील फुटपाथ, डिव्हायडर, गटारीची स्वच्छता करण्यात आली असून माती उचलण्यात आली, तसेच खांबावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रे पाण्याने धुवून काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे अनुकरण करून आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीवर आजच्या तरुण पिढीने प्रेम करावे. नगरकरांचे उड्डाणपुलाचे स्वप्न पूर्ण झाले असून प्रत्येक पिलर वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट रेखाटला आहे. या चित्रांचे सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सुद्धा कौतुक केले आहे. आज डीएसपी चौक ते शिल्पा गार्डन पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली असून महापालिकेने दोन महिन्यातून एकदा नियमितपणे उड्डाणपूल परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे. नागरिकांनी देखील परिसराची स्वच्छता राखावी, पोस्टर्स लावून विद्रुपीकरण करू नये.

यावेळी आमदार संग्राम जगताप,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, मा. नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अजिंक्य बोरकर, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवराज शिंदे, वैभव ढाकणे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें