श्रीरामपूर :अतुल देसर्डा
श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.श्री.सी.पी.राधाकृष्णन जी यांंची आमदार हेमंत ओगले यांनी राजभवन येथे भेट घेतली. यावेळी श्रीरामपूर शहरामध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई मध्ये विस्थिपित झालेल्या नागरीकांच्या उद्योग-व्यवसाय तसेच घरांचे पुनवर्सन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची विनंती महामहिम राज्यपाल महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी खालील मुद्दे महामहिम राज्यपाल महोदय यांच्याकडे विस्तृतपणे मांडले.
नगरपालिका प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे छोटे-मोठे व्यवसाय उद्ध्वस्त झाले असून अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान तसेच वडिलधाऱ्या माय-बाप जनतेचे आजारपणाचे प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
श्रीरामपूर शहरात म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या जागेत किंवा शेती महामंडळाच्या गरीब लोकांच्या घरकुलाकरिता हस्तांतरीत झालेल्या गट नं ७३ मधील ८ हे. ४० आर. या जागेत पुनर्वसन करता येणे शक्य असून व्यावसायिकांना स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाल्यास हे व्यावसायिक उभारी घेऊ शकतील.
तसेच भविष्यात अशा प्रकारची कारवाई करताना नागरीकांचे स्थलांतर करावे जेणेकरून लहान मुलांचे, महिला व वयोवृद्ध लोकांचे हाल होणार नाहीत.