अहिल्यानगर :शहाजी दिघे
अहिल्यानगर – पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने व जिल्हा कार्यकारिणीने कोपरगाव तालुका कार्यकारिणी घोषित केली. त्यात प्रशांत रावसाहेब टेके पाटील यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे . सुमित दगडू दरेकर तालुका उपाध्यक्ष, डॉ.तानाजी रावजी लामखडे मामा जेष्ठ मार्गदर्शक, बापू परभत घुमरे सचिव, नामदेव सुकदेव कोळपे संघटक, आप्पासाहेब बाबुराव रहाणे उपसंघटक, प्रल्हाद भगवान मेहेरे उपसंघटक आदीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर पत्रकारांच्या विशेष हक्कांसाठी लढा देण्यासाठी उभी असलेली एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया विश्वासाने पाहिले जाते.संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात संघटना नेत्रदीपक कामगिरी बजावत आहे. त्यांना राज्य कार्यकारिणी सदस्यांचे प्रबळ पाठबळ मिळत असते.तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी नियुक्ती करण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. नवनियुक्त कोपरगाव तालुका कार्यकारिणीचे सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात येत आहे.कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या समस्या आपल्या लेखनातून विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पर्यंत पोहचवणारा मुख्य माध्यम असणाऱ्या पत्रकार बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असेल, असे प्रतिपादन नुतन तालुकाध्यक्ष प्रशांत टेके पाटील यांनी केले आहे