September 11, 2025 1:14 pm

हंगा येथे दिव्यांगांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा ; खासदार नीलेश लंके यांची संकल्पना

अहिल्यानगर : शहाजी दिघे 

अहिल्यानगर : सी.बी. कोरा ग्रामोद्योग संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, भारत सरकारचे सुक्ष्म, लघु मंत्रालय व नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दिव्यांगांसाठी महारोजगार व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नगर दक्षिणेतील दिव्यांगांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेसाठी खासदार नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती लाभाणार असून सुक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रफुल्ल राहणे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण कोरंटीवर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या मार्गदर्शन शिबिरामध्ये ज्या दिव्यांगांना उद्योग व्यवसाय सुरू करायचे आहेत, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील १८ ते ५५ वयोगटातील सर्व दिव्यांग बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे दिव्यांग बांधव कार्यशाळेस उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांस दिव्यांगांची आवष्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याची मुभा आहे.

 

कोणती कागदपत्रे हवीत ?

आधार कार्ड, रेशन कार्ड, अपंग प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, शाळेचा दाखला, युआडी दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स.

 

५०० बांधवांना रोजगाराचे ध्येय

खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून एका वर्षात किमान ५०० दिव्यांग बांधवांना रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवण्यात आले आहे. खा. लंके यांचे हे ध्येय डोळयापुढे ठेऊन नीलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान अरोरात्र दिव्यांगांसाठी काम करत आहे.सुनील करंजुले अध्यक्ष, दिव्यांग प्रतिष्ठान

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें