September 11, 2025 1:17 pm

आमदार कर्डिले यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट :पुढील पंधरा दिवस सक्तीची विश्रांती 

राहुरी :शहाजी दिघे 

अहिल्यानगर : ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवताना व त्यांच्या सुख दु:खात सहभागी होताना कुटुंबाबरोबर स्वत:च्या शरीराकडे देखील दुर्लक्ष होत गेल्याने काही शारीरिक व्याधी निर्माण झाल्याने मागील महिनाभरापूर्वी पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय होणार असल्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आमदार कर्डिले चार दिवसांपूर्वी त्यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी पोहोचले. त्या ठिकाणी देखील डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्यामुळे आमदार कर्डिले निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

पुढील आठ दिवसानंतर ते पुन्हा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचुन जनसेवेमध्ये सक्रिय होणार आहेत. तीस वर्षे आमदार राहिलेले कर्डिले पहिल्यांदाच सक्रिय राजकारणातून मणक्याच्या त्रासामुळे महिनाभरापासून जनसामान्यांपासुन बाजूला राहिल्याने कार्यकर्त्यांना देखील त्यांना भेटण्याची व त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

परंतु, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पुढील आठ पंधरा दिवस तरी कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्यासाठी वाटच बघावी लागणार आहे. महिनाभर मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये राहिलेले आमदार कर्डिले हे देखील सर्वसामान्य जनतेच्या सुख दु:खात सक्रिय होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना देखील कार्यकर्त्यांना भेटण्याची मनोमन इच्छा आहे परंतु डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे देखील कर्मप्राप्त असल्याने कार्यकर्ता ते नेता यांच्यातील हा दुरावा काही काळासाठीच उरला आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें