अकोले :प्रतिनिधी
अकोले : रोटरी क्लब संगमनेर यांच्या वतीने अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला डिजिटल क्लासरूम भेट देण्यात आली.कळस बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात डिजिटल क्लासरूमचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी अजित काकडे यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक,शैक्षणिक,आरोग्याविषयक उपक्रमांची माहिती दिली.कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे,अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सिताराम वाकचौरे,अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे,संगमनेर साखर कारखाना संचालक संभाजी वाकचौरे,बाळासाहेब वाकचौरे यांची भाषणे झाली. यावेळी ऋषिकेश मोंढे यांनी शाळेला अकरा हजाराची देणगी दिली. रोटरी क्लबच्या वतीने इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या दुर्गा वाकचौरे हिचा एक हजार रुपये बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.दिलीप मालपाणी यांचा वाढदिवस विध्यार्थ्या समवेत साजरा करण्यात आला.या डिजिटलं क्लास रूमसाठी महेश वाकचौरे यांनी विशेष प्रयत्न केले.