वैजापूर : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रातून श्री संत एकनाथ महाराजांच्या षष्ठीसाठी पायी दिंडी निघाल्या आहेत.
त्याचप्रमाणे वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गोळवाडी येथून श्रीक्षेत्र पैठण श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाली आहे.
दिंडीसाठी नवीन रथ गावकऱ्यांनी बनवला आहे.
त्याची पूजा सकाळी स्वामी १०८ विमल गिरीजी महाराज (दहेगाव आश्रम) व बालगीरी महाराज (करंजगाव आश्रम) यांनी रथाची पूजा करू दिंडीला परवानगी दिली.
दिंडीसाठी ह भ प पांडुरंग महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गोळवाडी ते श्रीक्षेत्र पैठण निघाली आहे.
त्यासाठी संपूर्ण गोळवाडी मध्ये फेरि निघाली. गावकऱ्यांनी रथाची पूजा करून आनंदाने पुढे मार्गस्थ करून दिली.