संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर : मालपाणी लॉन्स हॉल, संगमनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आणि जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या देखरेखीखाली आयोजित ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा – २०२५’ या कार्यक्रमाचा शुभारंभ विविध विभागांचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन जलसंपदा विभाग, संगमनेर यांनी केले असून, हा कार्यक्रम निश्चितच प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना प्रभावीपणे राबवणे, हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच सरकारने सुचविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. जलसंपदा विभाग, संगमनेर येथील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांना त्यांच्या उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.