श्रीरामपूर – जम्मू कश्मीर राज्यातील पहलगाम (मिनी स्वित्सर्लंड)या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 30 भारतीय हिंदू पर्यटक नागरिकांचा काल मृत्यू झाला.या घटनेचा निषेध म्हणून शिवप्रहार संघटनेच्या वतीने श्रीरामपूर शहरामध्ये निषेध रॅली काढत पाकड्यांचा ध्वज जाळण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की,शिवप्रहारचे कार्याध्यक्ष पैलवान चंद्रशेखर( चंदू )आगे यांच्या नेतृत्वामध्ये शिवप्रहार कार्यालय,बजरंगनगर बेलापूररोड या ठिकाणावरून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोटारसायकल रॅली काढण्यात आली.ही रॅली शहरामधून जाऊन श्रीराम मंदिर चौकामध्ये शिवप्रहारचे अठरापगड मावळे एकत्र येत त्या ठिकाणी पाकिस्तान व दहशतवादाविरोधात “पाकिस्तानच्या म्हशीला …. “ या सारखी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज देखील यावेळी जाळण्यात आला.हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.