प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक :
कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगांव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे ठकुनाथ देवराम आहेर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब नारायण गंगावणे यांची बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांनी काम केले.
श्री. ठकुनाथ आहेर यांच्या नावाची सुचना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर यांनी केली तर त्यास दिलीप बनकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब गंगावणे यांच्या नावाची सुचना दादा आसने यांनी केली तर त्यास सुदाम आहेर यांनी अनुमोदन दिले.
नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष ठकुनाथ आहेर म्हणाले की, जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सभासद शेतक-यांच्या विकासात्मक योजनांची परिपुर्ण अंमलबजावणी करू.
याप्रसंगी सर्वश्री. चांगदेव आहेर, पोपटराव आसने, भास्कर जाधव, अरूण महाजन, पांडुरंग डफाळ, दत्तात्रय सोमासे, काशिगिरी गोसावी, कारभारी सोनवणे, श्रीमती कुसुमताई बनकर, सौ मंगल महाजन, सरपंच अनुराग येवले, मधुकर महाजन, महेश देशमुख, सोमनाथ आसने, जगन्नाथ आहेर, संजय वाकचौरे, आण्णा वाकचौरे, बाबुराव वाकचौरे, अशोक येवले, कचरू जाधव, बाळासाहेब आहेर, ज्ञानदेव जगधने, किशोर आहेर, पोलिस पाटील रविंद्र बनकर, चांगदेव आसने, कारभारी सोनवणे, बाळासाहेब बनकर, संजय वाबळे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी सचिव भागवत वाकचौरे यांनी आभार मानले.