September 21, 2025 3:45 pm

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक :

कोपरगाव : काश्मीरमधील निसर्गरम्य आणि शांततामय पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक नागरिकांनी आपले प्राण गमावले. देश दुःखात असताना या पार्श्वभूमीवर २७ एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी घेतला आहे.

देशातील विविध राज्यांमधून पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना टार्गेट करत करण्यात आलेला हा कायरतापूर्ण हल्ला केवळ अमानुष नव्हे, तर मानवी मूल्यांनाही काळिमा फासणारा आहे.या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून नागरिकांच्या मनात तीव्र वेदना आणि दुःख आहे. या पार्श्वभूमीवर विवेकभैय्या कोल्हे यांनी एक भावनिक आणि सुसंवेदनशील निर्णय घेतला आहे.या हल्ल्यात प्राण गेलेल्या देश बांधवांप्रति श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केली आहे.

२७ एप्रिल हा त्यांचा वाढदिवस असून दरवर्षी या दिवशी युवक,कार्यकर्ते, सहकारी, उद्योजक,शेतकरी बांधव आणि हितचिंतक मोठ्या उत्साहाने शुभेच्छा देतात. मात्र यंदा, देशावर आलेल्या या दुःखद प्रसंगामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या दिवशी कोणताही सार्वजनिक आंदोत्सव कार्यक्रम, स्वागत समारंभ किंवा जल्लोष केला जाणार नाही. तसेच हार, बुके, केक किंवा फ्लेक्सच्या स्वरूपातील शुभेच्छा कुणीही देऊ नयेत असेही आवाहन केले आहे.
त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जेव्हा देश शोकसागरात आहे, तेव्हा वैयक्तिक आनंद साजरेपणाला थांबवणे ही आपली नैतिक जबाबदारी असते.तुमचा आशीर्वाद आणि साथ ती नेहमी माझ्यासोबत राहिली आहे आणि पुढेही राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा