राहूरी :प्रतिनिधी
राहूरी – राहुरी येथे पोलीस स्टेशनच्या इमारतीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
४ कोटी १७ लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असून ठाणे अंमलदार कक्ष, पुरुष व महिला कारागृह, चौकशी कक्ष, सीसीटिव्ही कक्ष, स्वच्छतागृह, पारपत्र कार्यालय, बैठक हॉल उभारण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर बैठक कक्ष, रेकॉर्ड रूम, मुद्देमाल कक्ष, आराम कक्ष, निर्भय कक्ष, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृह आदी सुविधा असणार आहेत. तसेच भूमीगत पाणीटाकी, अंतर्गत रस्ताही यातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास आमदार शिवाजी कर्डीले, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे आदी उपस्थित होते.