September 21, 2025 3:49 pm

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिरसगांव सावळगांव जिल्हा परिषद शाळेत आदिवासी मुलांना शालेय वस्तुचे वाटप

प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक :
कोपरगाव: सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासु युवा अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगावं तालुका औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांनी शिरसगांव सावळगांव जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुला-मुलींना शालेयपयोगी वस्तु व गणवेशाचे वाटप केले.

प्रारंभी जम्मु काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ देशबांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यांत आली.

श्री. केशव भवर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याची भुमिका घेत या हल्ल्यात निरपराध व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले त्याबददल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली. युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी अल्पावधीत येसगांवपासुन ते राज्यपातळीपर्यंत व जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या इफको या संस्थेत आपल्या कामकाजाचा ठसा उमटविलेला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा जपत युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी सामाजिक वाटचाल सुरू केली आहे. कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक या नात्याने त्यांनी उद्योग, शेती, अर्थकारण, बँकींग, शिक्षण, सहकार, आदि क्षेत्रात काम करून विकासावर सातत्याने भर दिलेला आहे. त्यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून आदिवासी मुला मुलींना शालेय वस्तु वाटप केल्या त्यात शिरसगांव सावळगांवसह पुर्व भागातील प्रत्येक सहकारी व्यक्तींची साथ लाभली आहे. ग्रामिण भागातील मुला मुलींमध्ये गुणवत्ता आहे मात्र त्याला योग्य पध्दतीने आकार देवुन त्यांचा राज्य व राष्ट्रीय स्तरावर सन्मान कसा वाढेल यासाठीही युवानेते विवेक भैय्या कोल्हे सतत कार्यरत राहतात हे गौरव आणि सांगावेसे वाटते असे ते शेवटी म्हणांले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा