September 21, 2025 2:17 pm

जिल्ह्यातील १६ केंद्रांवर ४ मे रोजी नीट परीक्षेचे आयोजन : परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश

अहिल्यानगर :प्रतिनिधी

अहिल्यानगर – राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट परीक्षा २०२५ (NEET) ४ मे २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत १६ केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी अहिल्यानगर उपविभागाच्या महसूल स्थळसीमेच्या हद्दीतील परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये वरील दिनांकास सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी. आय.एस.डी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक, झेरॉक्स मशिन, स्कॅनिंग मशिन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वस्तु कार्यान्वित ठेवण्यात येऊ नयेत. परीक्षा उपकेंद्राच्या परिघामध्ये परिक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना वाहनांने अथवा पायी फिरण्यास, उभे राहण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा