September 21, 2025 2:17 pm

दिघेवस्ती(धानोरे)शाळेचा चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा

अहिल्यानगर मराठी न्यूज: शहाजी दिघे

सोनगाव: राहुरी तालुक्यातील उपक्रमशील,मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती(धानोरे) शाळेत इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री.मोहनीराज तुंबारे साहेब हे होते.तत्पूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी श्री.मोहनीराज तुंबारे साहेब यांचा शाल व रोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आरोही अंत्रे,स्वरा शिंदे,अनुष्का दिघे,सार्थक खेमनर,अपेक्षा शिंदे,संस्कृती अंत्रे,श्रावणी दिघे,स्वरा निकम,स्वरा खेमनर,प्रणाली दिघे, दिव्या सिनारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन व सूत्रसंचालन केले होते.चौथीचे वर्गशिक्षक श्री.सोमनाथ अनाप यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मेहनत करून यश संपादन करण्यास सांगितले.

या प्रसंगी इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व भावूक भाषणांनी आपल्या भावनांना वाट करून दिली तसेच आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त,संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी इयत्ता पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांनी आम्हांला तुमची खूप आठवण येईल,तुम्ही पुढे शिकून यशस्वी झाले तर आम्हाला खूप आनंद होईल. अशा भावना व्यक्त केल्या.पालक पूजा डुबे यांनी अतिशय भावनिक होऊन शाळेप्रती मनोगत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षिय भाषणात श्री.मोहनीराज तुंबारे साहेब यांनी कठीण व हलाखीच्या परिस्थितीवर मेहनत व संघर्षाने मात करून सर्व सामान्य कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात असे प्रतिपादन केले. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी आज पर्यंत MPSC मध्ये यश मिळवले आहे.यापुढे UPSC परीक्षेतही भविष्यात उज्ज्वल यश मिळवावे असे मत व्यक्त केले.

 श्री.गंगाधर साळुंके यांनी सर्व विद्यार्थी व पालकांसाठी स्वादिष्ट भोजन दिले व शाळेच्या भौतिक सुविधेसाठी रोख ५००० रु.देणगी दिली. चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी फॅन भेट दिला.श्री.रामेश्वर पाटोळे यांनी शाळेसाठी कॉलर माईक देण्याचे जाहीर केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे,श्री.राजेंद्र बोकंद,श्रीम.विद्याताई उदावंत,श्रीम.सुनिता ताजणे,श्रीम.मनिषा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती,माता-पालक संघ,शिक्षक-पालक संघ व सांस्कृतिक समिती यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही अंत्रे हिने तर आभार प्रदर्शन सार्थक खेमनर याने केले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा