September 21, 2025 2:17 pm

शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ-बिपीनदादा कोल्हे.

प्रशांत टेके पाटील  :

कोपरगाव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल हा ध्यास घेत काम केले त्याचाच अवलंब संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने सुरू आहे, शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि एआय (कृत्रिम युध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ होते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील धामोरी येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, प्रगतशिल शेतकरी कैलास माळी यांच्या शेतावर कृत्रिम बुध्दीमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस लागवडीच्या प्लॉटची पाहणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत गेल्या दोन वर्षापासुन उस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाची मदत कार्यक्रम सुरू असुन पहिल्या टप्प्यातील शेतक-यांचे निष्कर्ष चांगल्या पध्दतीने मिळाले आहे.

ते पुढे म्हणाले की, ए आय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन प्रति एकरी उसाचे उत्पादन वाढणार आहे तसेच महाराष्ट्र राज्यात ऊस पिकात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंतरपिके घेतली आहेत त्याबाबतचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळावे. ऊस लागवडीखालील क्षेत्रफळात जगात भारत देश सर्वात मोठा आहे, मात्र प्रति हेक्टरी उत्पादकतेत आपण मागे आहोत. तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्र राज्य उस उत्पादनांत पिछाडीवर आहे. कमी उत्पादकतेसाठी जमीनीचे आरोग्य, खत व पाण्याचा असंतुलीत वापर, वातावरणांतील चढ उतार ही प्रमुख कारणे आहेत. या करीता शेतक-यांनी कृत्रिम बुध्दीमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उस लागवड केल्यास उत्पादनांत ३० ते ४० टक्के वाढ होवुन खर्चात ३० टक्के बचत होते. कैलास माळी यांच्यासह धामोरी गावात तीन एकर क्षेत्रावर उस लागवड करण्यांत आली त्याची पाहणी समाधानकारक आहे. शेतक-यांची उस पीक कर्ज मर्यादा वाढत आहे तर दुसरीकडे उस उत्पादकता कमी होत आहे. एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या मदतीने हे चित्र बदलण्यांस मदतच होणार आहे. शेतक-यांनी या प्रभावी तंत्रज्ञानाच्या वापरातुन प्रति एकरी ८० मे. टन उसाचे उत्पादन घ्यायचेच आहे असा चंग बांधावा. १५ मे नंतर हुमणी अळीचे भुंगेरे बाहेर पडतात ते गोळा करण्यासाठी सर्वांनी लाईट ट्रॅप शेतात लावावा यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण करण्यासाठी मदत होईल असेही ते म्हणांले.

प्रारंभी प्रगतशिल शेतकरी अशोकराव भाकरे यांनी प्रास्तविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व संचालक सहका-यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रति एकरी उसउत्पादनांत वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यांत आलेल्या उपक्रमांची माहिती दिली, शेवटी कैलास माळी यांनी आभार मानले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा