September 21, 2025 2:18 pm

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंगल कलश रथयात्रेचे शिर्डी शहरात उत्स्फूर्त स्वागत!

शिर्डी: राहुल फुंदे

शिर्डी : यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित मंगल कलश रथयात्रा आज शिङी शहरात पोहोचली. यावेळी, आमदार अशितोष काळे यांनी या मंगल कलश यात्रेचे स्वागत केले.. शासकीय विश्रामगृह येथून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली अहिल्यानगर मधून विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले होते या कलशाची मिरवणूक साईबाबा मंदिर संपन्न झाली

संघटनेचा उद्देश आणि दृष्टीकोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकासाचा मार्ग अवलंबला आहे.

या यात्रेद्वारे, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान व्यक्त करण्यात येतो. सामाजिक ऐक्य, सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला जातो.जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची जाणीव घेतली जाते. संघटन बळकटीकरणाद्वारे आगामी राजकीय लढाईसाठी मैदान मजबूत केले जाते. ही यात्रा केवळ एक राजकीय उपक्रम नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उत्सव आहे.या संपूर्ण प्रवासात स्थानिक कार्यकर्त्यांचा जल्लोष, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वाद्यांचे वाजवणे, आणि उत्साही स्वागताने यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

 

यात्रेचा संदेश- महाराष्ट्राची एकता व अखंडतेचा सन्मान, सर्व जाती, धर्म, पंथांना समान वागणूक देणे, जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणे, ग्रामीण व शहरी भागात संवाद व विश्वास वाढवणे, संघटनात्मक बळकटता साधणे आणि नवचैतन्य निर्माण करणे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ठाम विश्वास व्यक्त केला की “ही यात्रा केवळ धार्मिक वा राजकीय कार्यक्रम नसून, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. उत्तर महाराष्ट्रात नवसंजीवनी फुंकणारी ही यात्रा जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नव्या विश्वासाचा संचार करेल,” असा ठाम विश्वास मी या प्रसंगी व्यक्त केला.

यावेळी, आमदार अशितोष काळे मा. आमदार लहुजी कानडे जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर बाबासाहेब कोते मा उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते अमित शेळके शिर्डी शहराध्यक्ष दिपक रमेश गोंदकर युवक शिर्डी शहराध्यक्ष निलेश शिंदे गंगाधर वाघ रामू तिवारी लक्ष्मण झाडे राहुल खरातशहरातील विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा