September 11, 2025 1:15 pm

शिर्डीतील श्री साईनाथ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात – दिपक गोंदकर

अहिल्यानगर मराठी न्यूज: राहुल फुंदे

शिर्डी -गोरगरीब जनतेची सेवा आणि ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे ब्रीद व्रत मानणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीतील श्री साईनाथ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे. याकरिता स्वतंत्र एमआरआय आणि सिटीस्कॅन विभाग सुरू करण्याची आणि बालकांसाठी स्वतंत्र आयसीयु युनिटसह प्रौढांसाठी आयसीयु खाटांची संख्या वाढवण्याची मागणी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे.

दरम्यान साई संस्थानच्या रुग्णालयात महाराष्ट्रासह देशभरातून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. विशेषतः एमआरआय व सिटीस्कॅनसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, रुग्णांना आठवडे, कधी कधी महिन्याभराची प्रतिक्षा करावी लागते. ही स्थिती गंभीर असून, वेळेत निदान न झाल्यामुळे उपचार विलंबाने होतात व रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या विभागाची स्वतंत्र सुसज्ज केंद्र रुग्णालय स्थापन करणे काळाची गरज असल्याचे गोंदकर यांनी निदर्शित केले.गर्भवती महिलांची प्रसूती, नवजात अर्भकांच्या तातडीच्या केसेस आणि गंभीर आजाराने पीडित बाल रुग्णांसाठी शिर्डीमध्ये अद्याप स्वतंत्र बाल आयसीयु उपलब्ध नाही. परिणामी अशा रुग्णांना नाशिक, पुणे किंवा मुंबई गाठावी लागते, ज्यामुळे वेळ व पैसा वाया जातो तसेच जीवित हानीचीही भीती निर्माण होते. श्री साईनाथ रुग्णालयासारख्या संस्थेत बालकांसाठी स्वतंत्र आयसीयु असणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.सध्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रौढांसाठी असलेल्या आयसीयु खाटांची संख्या अपुरी आहे. जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे येथे दररोज खचाखच गर्दी असते. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे रुग्ण तातडीने आयसीयु बेड न मिळाल्याने उपचारासाठी दुसरीकडे हलवावे लागतात, यामुळे रुग्ण व नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आयसीयु विभागाचे विस्तारीकरण तातडीने करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.श्री साईबाबांच्या रुग्णसेवेच्या तत्वज्ञानाशी सुसंगत अशी ही मागणी असून, संस्थान प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे. श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध असल्या तरी त्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पुरेशा ठरत नाहीत. त्यामुळे या योजनेला गती देऊन गोरगरिबांच्या जीवनाला आधार देण्याची गरज आहे.यासंदर्भात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्याकडे निवेदन देऊन पुढील कार्यवाहीसाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी बाबासाहेब अप्पा कोते , रमेश ( भाऊ ) गोंदकर,निलेश दादा कोते,अमितजी शेळके,शहर अध्यक्ष दिपक गोंदकर, युवक अध्यक्ष निलेश शिंदे अनिल कोते, साई कोतकर,अमोल सुपेकर, सचिन सो.गोंदकर,अमोल गिरमे,राहुल फुंदे,रामू तिवारी,सादिक शेख,फिरोज पठाण,राजेंद्र कांबळे,गणेश कानडे व इतर उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें