September 11, 2025 1:17 pm

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे कोपरगाव नगरीत आगमन; स्नेहलताताई कोल्हे यांनी घेतले दर्शन व आशीर्वाद

अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके

कोपरगाव नगरीत महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल येथे भगवान सोरटी सोमनाथ यांचे हजारो वर्षांपूर्वीचे पवित्र मूळ ज्योतिर्लिंग प्रथमच कोपरगाव येथील भक्तांच्या दर्शनासाठी आणले गेले. यानिमित्ताने कोपरगाव शहरात भक्तिभावाने भारलेले वातावरण निर्माण झाले होते. या विशेष प्रसंगी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दर्शन घेऊन ज्योतिर्लिंगाचे पूजन केले व भक्तिभावाने आशीर्वाद घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. प्रारंभ गणपती वंदनेने झाला. त्यानंतर सत्संग, ‘ॐ नमः शिवाय’ मंत्रजप व विशेष ध्यान सत्र पार पडले. नंतर पूजन व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवण्यात आले. या सर्व धार्मिक क्रियांमध्ये कोपरगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये परम पूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या आर्ट ऑफ लिविंग संस्थेचा मोलाचा वाटा होता. या वेळी परमपूज्य राघवेश्वरानंदजी महाराज (उंडे महाराज), आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक डॉ. अंकित कृष्णानी, विजयाताई काळे, वैशालीताई वाजे, विद्याताई सोनवणे, वैशालीताई जाधव, सुवर्णाताई सोनवणे, दीपाताई गिरमे, विजयाताई देवकर, प्रदीपराव नवले, विवेक सोनवणे, देविदास रोठे, गोपी सोनवणे, रोहन दरपेल, शंकर बिराडे आदी मान्यवर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आर्ट ऑफ लिविंगचे सर्व सदस्य आणि कोपरगावातील असंख्य शिवभक्त यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन कोपरगावकरांसाठी एक भक्तिपूर्ण पर्वणी ठरली असून, या सोहळ्यामुळे अध्यात्मिक उर्जा व श्रद्धेचा नवा संचार शहरात झाला आहे. यामुळे कोपरगाव नगरी अधिक पवित्र व पुण्यवान ऊर्जा निर्माण झाली आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें