अहिल्यानगर मराठी न्यूज :अनिल वाकचौरे
सोनगाव (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील सालाबादप्रमाणे रविवार दिनांक २९/ ६/ २०२५ येशू हृदय यात्रा जोरदार साजरी करण्यात आली. यात्रेच्या तीन दिवस त्रिदिन भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसात फा. आल्वीन मिस्किटा यांच्या मधुर वाणीतून तीन दिवस भाविकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. यात्रेच्या दिवशी पेठेतून येशू हृदय प्रतिमेची मिरवणूक होऊन सायंकाळी टिळकनगर येथील फा.पिटर डिसोजा यांनी यात्रेत प्रवचन करून मिस्सा अर्पण केला.
प्रसंगी प्रमुख धर्मगुरू फा. रॉनी परेरा, फा. विल्सन रुमाव, फा. अश्ली डीमोंटी, फा. जस्टीन व इतर धर्मग्रामातील बहुसंख्य फादर, सिस्टर्स पॅरिश कौन्सिल मेंबर व नागरिक उपस्थित होते.