अहिल्यानगर मराठी न्यूज : राहुल फुंदे
शिर्डी : साईसंगम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले
आर झुनझुनवाला आय केयर हॉस्पिटल मुंबई साईसंगम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर रविवार दि. २९/०६/२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारपर्यंत या वेळेत आयोजीत केलेले होते. शिबिराचे उदघाटन सकाळी १० वाजता श्रीची अनेक मान्यवरांच्या हस्ते आरतीकरून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शिर्डीसह पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी लाभ घेतला शिबीर यशस्वी व्हावे याकरीता शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या साईसंगम संस्थेचे सर्वेसर्वा संदीप भाऊ सोनावणे यांच्या मार्दर्शनाखाली साईसंगम संस्थेचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते आर झुनझुनवाला आय केयर मुंबई रुग्णालय येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची तपासणी करुन त्यांचे निदान केले. आणि या पुढेही समाज हिताचे कार्य नित्यनियमाने सुरूच राहणार असल्याचे या वेळी संदीप भाऊ सोनवणे यांनी सांगितले साईसंगम सेवाभावी संस्थे मार्फत वर्षभर अनेक सामाजिक कार्य केले जातात गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो आमच्या हाताने अशीच सेवा कायम घडत राहो अशी मा.संदिप सोनावणे प्रार्थना संदीप भाऊ सोनावणे यांनी केली आर पी आय चे नेते प्रदीप (पप्पू) बनसोडे, फकिरा लोढा, सुनील सोनवणे, सचिन तुरकणे राहुल खरात सुनील राखपसारे आदिनाथ वाघ लक्ष्मण झाडे सुनील तुपे मुर्गे ब्रदर शुभम मुर्तडक सुनील गुरख गणपत भागवत रवींद्र तुरकने जालिंदर तुरकने किशोर दंडवते विलास गायकवाड चंद्रकांत देवकर जालिंदर शिंदे प्रदीप पठारे प्रमोद गाढवे म्यानसिंग सतीश जाधव गिरीश सोनेजी अमोल कमोटकर प्रवीण सरोदे आणि साईसंगम संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते