अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
श्रीरामपूर: नगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर उपविभागांमध्ये अनेक वर्षे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुन्हे उघडकीस आणण्यात आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात त्यांना विशेष कौशल्य असल्याने,त्यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख मिळाली आहे. संगमनेर व शिर्डी येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली होती.
वर्ष २०२४ मध्ये त्यांची पदोन्नती होऊन एस आर पी एफ (राज्य राखीव पोलीस बल) गट क्रमांक ५ येथे बदली झाली होती.आता पुन्हा एकदा त्यांची श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा सशक्त बंदोबस्त राहील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
श्रीरामपूरचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्गे यांची काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे बदली झाली होती.त्यांच्या बदलीनंतर श्रीरामपुर येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती झाली आहे.