September 19, 2025 1:35 pm

माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मध्यस्थीने श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील गाळेधारकांच्या भाडे वाढीस स्थगिती

अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे

श्रीरामपूर (प्रतिनिधी):श्रीरामपूर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील ७२२ गाळे धारकांना ७५% भाडे वाढ करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हा पासून गाळे धारकांमध्ये प्रचंड रोष होता. मध्यंतरी कोरोनाच्या साथीनंतर श्रीरामपूर शहरातील गाळे धारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी झाली. त्यानंतर आता व्यावसायिक हळू हळू आपला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात हि भाडे वाढ अन्याय कारक आहे म्हणून गाळे धारकांमध्ये अस्वस्थता होती. 

सदर गाळे धारकांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांना भेटून भाडे वाढ करू नये म्हणून विनंती केली होती. म्हणून संजय फंड यांनी काही गाळाधारक यांचे शिष्ट मंडल घेऊन मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांची भेट घेतली व आपली व्यथा मांडली.

मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी गाळे धारकांची व्यथा ऐकून घेत राज्याचे जलसंपदा, कृष्णा व गोदावरी खोरे मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून नामदार विखे पाटील साहेब यांच्या मार्फत श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना सध्या भाडेवाढ करू नये अशा सूचना दिल्या. 

तसेच सदर भाडेवाढ स्थगिती बाबत शासन स्थरावर प्रस्ताव पाठवण्यास सांगितले असून शासनाचे आदेश होई पर्यंत कुठलेही भाडेवाढ करू नये अशा सूचना देण्यात आल्या. या कामी माजी नगराध्यक्ष संजय फंड, आशिष धनवटे, जितेंद्र छाजेड, सोमनाथ गांगड, संजय गांगड, सागर भागवत, अमोल शेटे व सर्व गाळे धारक उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें