अहिल्यानगर : तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे गोरक्षनाथ गडावर धर्मानाथ बीज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गडावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मनाथ बीज निमित्त सुमार २५ हजार भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष शंकर कदम यांनी दिली. शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य धार्मिक ठिकाण आहे. धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. गोरक्षनाथ महाराजांनी धर्मनाथांना नाथपंताची दीक्षा याच दिवशी दिल्यामुळे या उत्सवाला एक धार्मिक महत्त्व आहे. सकाळी अभिषेक, महापूजा, व त्या नंतर रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
