मंडळी डिजिटल युगात युनिफाइड पेमेंट इंटरफेस पेमेंट्स आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. या माध्यमातून पैशांचे व्यवहार जलद आणि सोपे होतात. दररोज देशभरात शेकडो कोटी यु. पी. आय.व्यवहार होतात, ज्यात हजारो कोटी रुपयांची देवाणघेवाण केली जाते. दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येच नाही, तर लहान खेड्यांमध्येही यु. पी. आय.चा वापर वाढलेला आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून यु. पी. आय ट्रांजेक्शनसाठी नवीन नियम लागू होणार आहेत, ज्यामुळे व्यवहारांवर थेट परिणाम होईल.
१ फेब्रुवारी २०२५ पासून यु.पी. आय.पेमेंट ॲप्समध्ये ट्रांजेक्शन आय साठी @, $, &, # यांसारख्या विशेष चिन्हांचा वापर करता येणार नाही. अशा चिन्हांचा वापर करणारे यु. पी. आय ॲप्स फेल होऊ शकतात, ज्यामुळे व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य यु. पी. आय ॲप निवडणे महत्त्वाचे आहे.
२. एन पी. सी. आय ने यु. पी. आय ट्रांजेक्शन आय डी साठी एकसंध प्रणाली तयार केली आहे, ज्यामध्ये केवळ अक्षरे (A-Z) आणि अंक (0-9) वापरणे अनिवार्य असेल. विशेष चिन्हांचा वापर टाळण्यासाठी NPCI ने सर्व पेमेंट ॲप्सना सूचना दिल्या आहेत. जर ॲप या नियमांचे पालन केले नाही, तर त्याचे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत.
३.एन. पी. सी. आय ने ९ जानेवारी २०२५ रोजी एक सर्क्युलर जारी करून स्पष्ट केले की,२८ मार्च २०२४ च्या ओ सी १९३ च्या संदर्भानुसार, यु. पी. आय ॲप्सने फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरावे. १ फेब्रुवारी २०२५ पासून स्पेशल कॅरेक्टर असलेले व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, आणि सेंट्रल सिस्टम अशा व्यवहारांना नकार देईल
४ एन. पी. सी आय च्या २८ मार्च २०२४च्या सर्क्युलरमध्ये दिलेल्या निर्देशानुसार, प्रत्येक यु. पी. आय ट्रांजेक्शन आय. डी किमान ३५अंकांची असावी. ३५ डिजिट्सपेक्षा कमी किंवा जास्त असलेल्या आय डी चे व्यवहार रद्द केले जातील.
या बदलामुळे, जर तुमच्या यु. पी. आय ॲपमध्ये स्पेशल कॅरेक्टरयुक्त ट्रांजेक्शन आय. डी असेल, तर तुमचे व्यवहार फेल होऊ शकतात. यु. पी. आय व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी तुम्हाला एन. पी. सी. आय च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे पेमेंट ॲप वापरणे आवश्यक आहे. बँका आणि पेमेंट ॲप्सना यासाठी १ फेब्रुवारी २०२५ पूर्वी सुधारणा करणे गरजेचे आहे.
एन. पी. सी. आय या बदलाद्वारे ये. पी. आय व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या पेमेंट ॲपमध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून, १फेब्रुवारी २०२५ पूर्वी तुमचे यु. पी. आय ॲप अपडेट करणे महत्त्वाचे आहे.