September 11, 2025 1:32 pm

शिक्षणाच्या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा – आमदार मोनिका राजळे

अहिल्यानगर :शहाजी दिघे

शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आता रोज नवीन तंत्रज्ञान आणि संधी निर्माण होत आहे. त्याची माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट व सोशल मीडिया यासारखी साधने यांच्या माध्यमातून माहिती घेऊन त्या माहितीचा व उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा वापर करून तालुक्यातील अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारचे करिअर करत आहे.

त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदल्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. श्री हरिहरेश्वर कला व विज्ञान महाविदयालय,कोरडगाव येथे इयत्ता १२ वी निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजळे बोलत होत्या. यावेळी आयडल स्टार फौडेंशनच्या अध्यक्षा हेमा लोमटे उपस्थित होत्या.

हेमा लोमटे यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्याशिवाय तो अपेक्षित यश प्राप्त करू शकत नाही. ध्येय निश्चिती आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न महत्वाचे असतात. सरकारी नोकऱ्याबरोबर खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या संधी आहेत, त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.

यावेळी खरेदी-विक्रीचे चेअरमन बंडू पठाडे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी भास्कर गोरे, संजय फुंदे, नवनाथ भवार, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, मधुकर देशमुख, बळी काकडे, बापसाहेब फुंदे, नंदकिशोर वारंगुळे, अशोक कांजवणे, प्रकाश औसरमल आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें