September 11, 2025 8:34 am

आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकाॅर्ड! टी20 क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करत रचला इतिहास

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल सध्या आंतरराष्ट्रीय लीग टी २०मध्ये आबू धाबी नाईट रायडर्सकडून खेळत आहे. स्पर्धेतील २७ व्या सामन्यात शानदार कामगिरी करून रसेलने ९००० टी २० धावा पूर्ण केल्या.

रसेलने हा आकडा साध्या पद्धतीने गाठला नाही, तर त्याने टी ३० मध्ये ९००० धावांचा टप्पा ओलांडून वर्ल्ड रेकाॅर्ड केला.

आंद्रे रसेल टी २० मध्ये सर्वात जलद ९००० धावा करणारा फलंदाज ठरला. रसेलने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. रसेलने सर्वात कमी चेंडूंमध्ये हा आकडा गाठला. मॅक्सवेलने ५९२५ चेंडूंच्या मदतीने टी २०क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पा ओलांडला. तर रसेलने फक्त ५३२१ चेंडूत ही कामगिरी केली.

टी २०मध्ये सर्वात जलद ९००० धावा करणारा फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)-

आंद्रे रसेल – ५३२१ चेंडू

ग्लेन मॅक्सवेल – ५९१५ चेंडू

एबी डिव्हिलियर्स – ५९८५ चेंडू

किरॉन पोलार्ड – ५९८८ चेंडू

ख्रिस गेल – ६००७ चेंडू

अ‍ॅलेक्स हेल्स – ६१७५ चेंडू

आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय टी २० लीगच्या २७ व्या सामन्याद्वारे ९००० टी २० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. हा सामना आबू धाबी नाईट रायडर्स आणि गल्फ जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रसेलने २ चौकारांच्या मदतीने ६ चेंडूत फक्त ९ धावा केल्या, ज्याच्या मदतीने त्याने टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9,000 धावा करण्याचा वर्ल्ड रेकाॅर्ड केला.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें