अहिल्यानगर :शहाजी दिघे
अहिल्यानगर : लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ माननीय नामदार शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या समारंभात प्रवरा माध्यमिक विद्यालय, झरेकाठी तालुका संगमनेर येथील कुमारी वाकचौरे अनुष्का गहिनीनाथ या विद्यार्थिनी चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवुन तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे मॅडम, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्य रत्नपारखी मॅडम, प्रवरा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष जरे सर, विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.मनोज पवार सर उपस्थित होते. तालुकास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर सांगळे सर तसेच स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष पोपटराव वाणी पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष गोरख वाणी,पा. व सदस्य सर्व शिक्षक शिक्षिका पालक ग्रामस्थांनी अभिनंदन केले