लोणी :शहाजी दिघे
लोणी : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्वाकांक्षी कार्यक्रमात, पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील पुरातन मंदिरांच्या विकासाला प्राधान्य देण्याची घोषणा केली. हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रतीके असलेल्या या मंदिरांचा वारसा जोपासणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
राहाता शहराचे आराध्यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग देवस्थानाचा दर्जा प्राप्त करुन दिल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांचा विश्वस्त मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वीरभद्र महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाला पाठबळ देण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विकासाची प्रक्रिया पुढे घेवून जाताना पारंपरिक मंदिरांचा वारसाही जोपासणे आपले कर्तव्य आहे.” त्यांनी निधीच्या अभावामुळे मंदिर परिसरांच्या विकासात अडचणी येणार नाहीत याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमात माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, मुकुंदराव सदाफळ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाणे, अॅड.रघुनाथ बोठे, उपाध्यक्ष सचिन बोठे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदी उपस्थित होते.