September 11, 2025 1:32 pm

“आझाद मैदान मुंबई येथे युवा प्रशिक्षणार्थीचा एल्गार महामोर्चा “

मुंबई / प्रशांत टेके 

युवा प्रशिक्षणार्थी संघटना महाराष्ट्र राज्यव्यापी एल्गार महामोर्चा साठी मुंबई येथे आझाद मैदानावर युवा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दि.४ फेब्रुवारी रोजी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या विविध मागण्या साठी महामोर्चाचे हे.भ.प. तुकाराम बाबा महाराज तसेच अनुप चव्हाण व अप्पासाहेब भालेराव आदींनी आयोजन केले होते. मुंबई येथील आझाद मैदानावर ज्या मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रामुख्याने प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात वाढ करुन नियमितपणे देण्यात यावे.शासकीय नोकरदारां प्रमाणे रजा देण्यात यावी.युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत १० टक्के आरक्षण देण्यात यावे . प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपी नोकरी देण्यात यावी.या मागण्यांसाठी मान्य व्हाव्यात यासाठी युवा प्रशिक्षणार्थी महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें