अहिल्यानगर : शहाजी दिघे
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला तसाच भगवा आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाना, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सुतोवाच केले.
यासाठी सर्वच शिवसैनिकांनी जास्तीत-जास्त शिवसेनेची सभासद नोंदणी करावी, असा सल्ला आ.अमोल खताळ यांनी शिवसैनिकांना केली.
संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने बसस्थानकावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, शिवसेना वाढविण्यासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान तसेच गोरगरीब अनाथ मुलांना फळे आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेची सर्वाधिक नोंदणी करणारे शिवसैनिक सौरभ देशमुख यांच्यासह सुशील शेवाळे आणि दिपाली वाव्हळ यांचा आ. खताळ यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. वयोवृद्धांना काठी, कमरेचा व मानेचा पट्टा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष मंजाबापू साळवे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, भाजप महिला आघाडी तालुकाप्रमुख कविता पाटी, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, राहुल खताळ, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह शहर व तालुक्यातून आलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी करून आभार मानले. आधार रक्तपेढीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ५० दात्यांनी रक्तदान केले.गोरगरीब विद्यार्थ्यांना तसेच रिमांड होममधील अनाथ मुलांना शालेय साहित्य आणि फळ वाटप केले.
संगमनेरातील १०१ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान
शिवसेनेसाठी जीवाचे रान करणारे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते अर्जुन काशीद, माजी नगराध्यक्ष भाऊ पानसरे, अण्णासाहेब काळे, भारत शिंदे, बाळासाहेब राऊत, बंडू देशमुख, रणजीत जाधव, नारायण वाकचौरे, पंढरीनाथ इल्हे, विठ्ठल ढगे, शिवाजी घोडेकर यांच्यासह शंभर ते सव्वाशे ज्येष्ठ शिवसैनिकांचा आ.अमोल खताळ यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.