अहिल्यानगर :शहाजी दिघे
अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या पंचायत समिती (सर्व विभाग), पशु संवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) ह्या विभागांतील समस्या
सोडवण्यासाठी पंचायत समिती कोपरगाव येथे आज आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ पार पडला.यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कामात दिरंगाई केल्यास हयगय केली जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी गटविकास अधिकारी संदीपजी दळवी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.