अहिल्यानगर :शहाजी दिघे
अहिल्यानगर : महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून “छावा” चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आज या उपक्रमाचा शुभारंभ सिनेलाईफ मिनिप्लेक्स येथे करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व महिला भगिनी आपल्या हिंदुधर्माच्या शूरतेचे प्रतीक भगवे फेटे घालून उपस्थित होत्या.
छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवन गाथेवर आधारित असलेला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असून छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी कसे जगले व धर्मासाठी कसे त्यांनी बलिदान दिले हा इतिहास या चित्रपटात आहे. त्यांनी यातना सहन केल्या पण धर्मांतरण स्वीकारले नाही. त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतूने हा चित्रपट माता-भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या मुलांवरही असेच शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने हा उपक्रम काही हिंदू प्रेमी उद्योजकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. त्या सर्वांचेच मी आभार मानतो
यावेळी मोठ्या संख्येने महिला माता-भगिनी उपस्थित होत्या.