सोनगाव प्रतिनिधी : पोलिस निरीक्षक संजयजी ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाने आज सकाळच्या सुमारास तालूक्यातील बारागांव नांदूर परिसरात धडाकेबाज कारवाई करून तब्बल ३० ब्रास वाळूसाठा व एक चप्पू जप्त केला. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
राहुरी पोलिसांना १३ सप्टेंबर रोजी मिळालेल्या खबरीवरून पथकाने आज १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तालूक्यातील बारागाव नांदूर परिसरातील मुळा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून अज्ञात वाळू तस्करांनी उपसा केलेली ३ लाख रुपये किंमतीची ३० ब्रास वाळू व ४५ हजार रुपये किमतीचा चप्पू असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशानुसार बारागांव नांदूर येथील मंडळ अधिकारी मरकड मॅडम यांच्या ताब्यात मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी देण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते व सागर नवले आदि पोलिस पथकाने केली.