September 21, 2025 6:46 pm

राहुरी फॅक्टरीत शुक्रवारपासून संत कवी महिपती महाराज फिरता नारळी सप्ताह

राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात श्री.क्षेत्र तहाराबाद देवस्थान येथील संत कवी महिपती महाराज यांचा ५९ वा फिरता नारळी सप्ताह दिनांक शुक्रवार १८ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून या सप्ताह निमित्ताने दररोज सकाळी व सायंकाळी राज्यातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व दोन वेळेस हजारो भाविकांना महाप्रसादाची पंगत दिली जाणार आहे.

सप्ताह काळात १८ एप्रिल रोजी सकाळी अनंत महाराज काळे सायंकाळी देविदास महाराज आडभाई, १९ एप्रिल रोजी सकाळी तुकाराम बाबा जेऊरकर, सायंकाळी ज्ञानेश्वर महाराज पाटील, २० एप्रिल रोजी सकाळी नाना महाराज गागरे ,सायंकाळी आक्रूर महाराज साखरे, २१ एप्रिल रोजी सकाळी देविदास महाराज म्हस्के, सायंकाळी योगीराज महाराज गोसावी , २२ एप्रिल रोजी सकाळी महंत उद्धव महाराज मंडलिक , सायंकाळी जंगले म्हणेज शास्त्री, २३ एप्रिल रोजी सकाळी भागवत महाराज उंबरेकर , सायंकाळी उमेश महाराज दशरथे तर २४ एप्रिल रोजी सकाळी बाळकृष्ण महाराज कांबळे व सायंकाळी विकासानंद महाराज मिसाळ यांची कीर्तनसेवा पार पडणार आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी १०ते १२ या वेळेत संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसाद पंगतीने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
तरी या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत कवी महिपती महाराज सप्ताह कमिटी, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा यांनी केले आहे.
संत कवी महिपती महाराज फिरता नारळी सप्ताहाची तयारी पूर्ण झाली असून किर्तनासाठी भव्य दिव्य वॉटरप्रूफ मंडपची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्नप्रसादासाठी स्वतंत्र मंडप व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी १० ते १२ व सायंकाळी ७ ते ९ यावेळी कीर्तन व दोन्ही कीर्तनानंतर अन्नदान पंगत आहे. या सप्ताहासाठी तालुक्यातील सर्व गावातून आमटी भाकरी पंगतीसाठी सहकार्य लाभणार आहे. संत पूजन, अन्नदान इतर खर्चासाठी दानशूर मंडळी अन्नदाते मोलाचे सहकार्य करत आहेत.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा