September 21, 2025 6:46 pm

“कोपरगावात श्री शिव महापुराण कथा मोठ्या उत्साहात सुरू “.

प्रशांत टेके पाटील उपसंपादक

कोपरगाव — साधुसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र कोपरगाव येथे श्री शिवमहापुराण कथा सोहळा ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुराशे यांच्या श्रुश्राव्य वाणीतून शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ पासून शनिवार १९ एप्रिल २०२५ पर्यंत सायंकाळी ७ ते १० या कालावधीत समतानगर संपन्न होत आहे. समतानगर येथील ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात हा कथा सोहळा संपन्न होत आहे. कथाव्यास सुराशे महाराज श्री शिवमहापुराण कथेतील प्रत्येक कथा विस्तृतपणे सह उदाहरण मांडत असल्याने शिवभक्त पुरुष व माता भगिनी अतिशय मंत्रमुग्ध होऊन श्रवण करताना दिसतात. प्रसंगानुरुप अतिशय सुबक पद्धतीने सजविलेल्या झाक्यांचा प्रवेश कथेच्या व्यासपीठावर होताना देव देवता प्रत्यक्ष समता नगरीमध्ये अवतरल्याचा भास श्रोतेवर्गांना आनंद देऊन जात आहे. कथेसाठी किर्तनकार व मान्यवरांची उपस्थिती – स्वामी रमेशगिरीजी महाराज, ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री, ह.भ.प.उकिर्डे महाराज , ह.भ.प. शिवाजी महाराज ठाकरे , तसेच पत्रकार जनार्दन जगताप , व्हाईस ऑफ मिडिया कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रशांत टेके , सचिव बापू घुमरे तसेच मोकाटेबाबा, सुनील काजळे, दत्तात्रय सिनगर, बाबासाहेब लासुरे आदी सह अनेक मान्यवरांनी कथेला उपस्थिती दर्शविली.

उत्कृष्ठ साथसंगत सहयोगी – ह.भ.प. कृष्णा महाराज लकारे, सुनील सुरभैय्या, संजय महाराज आरणे,ओम महाराज बैरागी, यश लकारे ,हर्षल टेके, अनंत टेके आदींनी कथेला अतिशय उत्कृष्टपणे साथसंगत केली आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा