प्रतिनिधी : अनिल वाकचौरे
सोनगाव : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील गरुड झेप महिला प्रभाग संघ सात्रळ आणि प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था गणेगाव विद्यमाने यांच्यामार्फत ओमकार हॉस्पिटल व ड्रामा सेंटर भव्य आरोग्य शिबिर कॅप घेण्यात आला. आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एकत्रित उपचार व पाच लाखापर्यंत चा गंभीर आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिराला सर्व बचत गटातील महिला सात्रळ, धानोरे ,सोनगाव, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. तसेच या शिबिर आला सोनगाव चे अलका शिंदे ताई सरपंच उपस्थित होत्या. त्याचबरोबर महिलांचे वैयक्तिक शासनमान्य विमा काढण्यात आले. पी. एम. जे. जे बी. वाय व पी. एम एस बी वाय. २० व ४३६ रु माननीय चव्हाण सर उपस्थित राहून विमे काढण्यात आले. यावेळी उमेद अभियान सि. टी. सि, सि आर पी हजर होत्या. तसेच पत्रकार अनिल वाकचौरे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली.