अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ऋषिकेश मोरे आणि राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष उच्च अॅड. प्रशांत मुसमाडे उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुरी : राहूरी येथे शनिवारी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) न्यायालयाचे उदघाटन मुंबई न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन न्यायालया मुळे राहरी आणि परिसरातील लोकांना जलद न्याय मिळण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी अहमदनगरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे होत्या. सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. वरिष्ठस्तर न्यायाधीश मयूर पवार, कनिष्ठस्तरच्या मुख्य न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी,अंजू शेंडे यांनी या वरिष्ठ स्तर न्यायालया मुळे कायदेशीर अधिकार मागणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी आशा व्यक्त केली. हे न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकारांना जलद न्याय मिळेल, कंकणवाडी यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. संदीप इरोले यांनी केले. न्यायाधीश मयूर पवार यांनी आभार मानले.
याप्रसंगी अनेक मान्यवर न्यायाधीश, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सर्व महाराष्ट्र आणि गोवा बार वकील बांधव व भगिनी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमोल सावंत, राहुरी तसेच नागरिक उपस्थित होते.