अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
🌹सर्व विजेत्या खेळाडू विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.🌹
लोणी :(प्रतिनिधी )-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर व पी. व्ही. पी कॉलेज लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने पी. व्ही. पी.कॉलेज लोणी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड होऊन त्यांची आत्मा मलिक संकुल, कोकमठाण या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यामध्ये अनुक्रमे
1) सार्थक लक्ष्मण पवार इ ७ वी .(१४ वयोगट ) ४० किलो वजन कुस्ती तालुक्यात प्रथम
2) आरोह सुधीर म्हस्के इ. १० वी(१७ वयोगट )६० किलो वजन कुस्ती द्वितीय क्रमांक
३) साई जालिंदर खेमनर इ.९ वी (१७ वयोगट )६६ किलो वजन कुस्ती द्वितीय क्रमांक.
या विद्यार्थ्यानी प्रतिस्पर्धी खेळाडूवर उत्कृष्ट मात करत तालुका पातळीवर नेत्रदिपक कामगिरी करून आत्मा मलिक कोकमठाण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या सर्वांची निवड झालेली आहे.
विदयार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व विदयार्थ्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के, संस्थेचे संचालक मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कुस्ती या क्रीडा प्रकारात विदयार्थ्यांना क्रीडा शिक्षक सतीश पवार सर व संदीप निबे सर यांचे मार्गदर्शन लाभले.