November 8, 2025 6:45 am

सात्रळमध्ये ५ फूट लांबीचा कोब्रा साप पकडला; सर्पमित्र शिरसाठ यांची तत्पर कारवाई

 अहिल्यानगर मराठी न्यूज अहिल्यानगर
धानोरे (वार्ताहर): तालुक्यातील सात्रळ परिसरात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना शेतीत आणि घराजवळ हिंस्त्र प्राणी व सापांच्या हालचालींना सामोरे जावे लागत आहे. अशातच आज दुपारी सुमारास ३ वाजता सात्रळ येथील संदिप गावडे यांच्या वस्तीवर तब्बल ४ ते ५ फूट लांबीचा कोब्रा जातीचा साप आढळून आला. अचानक वस्तीवर हा साप दिसल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
संदिप गावडे यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्रकार अनिल वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला. व लगेचच कोल्हार येथील प्रसिद्ध सर्पमित्र श्री. शिरसाठ यांच्याशी संपर्क साधून मदत मागवली. माहिती मिळताच सर्पमित्र शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि साप सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले.
सर्पमित्र शिरसाठ यांनी सांगितले की, हा कोब्रा जातीचा साप अत्यंत विषारी असून मानवासाठी धोकादायक मानला जातो. मात्र, सापांचा नाश न करता त्यांना जपणे व सुरक्षित स्थळी सोडणे हेच पर्यावरणासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पकडलेला साप नंतर निर्जन आणि सुरक्षित ठिकाणी जंगल परिसरात सोडून दिला.
यावेळी उपस्थित संदिप गावडे व अनिल वाकचौरे यांनी शिरसाठ यांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले. त्यांनी सापाला इजा न करता कौशल्याने पकडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अतिवृष्टीनंतर ओलसर हवामानामुळे शेती परिसरात आणि घरांच्या आसपास साप व इतर सरपटणारे प्राणी दिसण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, साप दिसल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्रांना संपर्क साधावा, असे आवाहन शिरसाठ यांनी केले.
ग्रामस्थांनीही अशा परिस्थितीत संयम राखावा, साप किंवा इतर वन्य प्राण्यांना इजा न करता संबंधित वनविभाग अथवा सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सात्रळ परिसरात या घटनेची चर्चा सर्वत्र असून, सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे एका मोठ्या अनर्थाचा प्रसंग टळल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
— अहिल्यानगर मराठी न्यूज, सात्रळ प्रतिनिधी

*आमच्या व्हिडीओ चॅनलवर बातम्या पहाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
📞 विश्वास ठेवा सत्यावर — अहिल्यानगर मराठी न्यूजवर!संपर्क : शहाजी दिघे – ९४२०८०५२७७*

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें