नाथ दरबाराचे गुरुवर्य राहुल दिघे यांच्या शुभहस्ते, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने ‘जगदाळे वडेवाले’चा नवा प्रवास सुरू
राहाता (प्रतिनिधी) :माननीय जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण जी विखे पाटील यांच्या शुभ आशीर्वादाने आणि नाथ दरबार, राहाता येथील गुरुवर्य श्री राहुल सुखदेव पा. दिघे यांच्या पवित्र हस्ते सुप्रसिद्ध ‘जगदाळे वडेवाले’ यांच्या शाखा क्रमांक ३चे भव्य उद्घाटन सोहळा राहाता येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
स्थानिक नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला सामाजिक, व्यावसायिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास श्री बाळासाहेब ताके, श्री शरद पंढरीनाथ मोटे, एन. डी. विखे सर, अभयराजे ताठे, श्री महेश जगदाळे, श्री संजय आदिक, श्री प्रशांत जगताप, श्री संतोष डांगे, श्री अमोल नाईक, श्री अशोक कुंजीर, श्री राजेंद्र नागरे तसेच सोशल मीडियावरील लोकप्रिय ‘रील्स स्टार्स’ यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून संस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय अभय रोहोम, विजय दिघे, प्रवीण तुपे, रमेशकुमार पटेल, निखिल रासने, गौरव तुपे, विकी गिरमे, अनिकेत मारके, मारुती नागरे, यश नागरे आदींनी उत्साहाने केले.
या प्रसंगी ‘जगदाळे वडेवाले’ समूहाचे श्री संतोष कुंजीर व श्री आकाश नागरे यांनी ग्राहकांशी संवाद साधताना सांगितले, “गुणवत्तेचा स्वाद आणि विश्वासाची परंपरा जपत आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. लोणी व राहाता परिसरातील नागरिकांनी नव्या शाखेला भेट देऊन स्थानिक व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
खाद्यसंस्कृतीतील स्वदेशी मूल्ये, शुद्धता आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर उभा असलेला ‘जगदाळे वडेवाले’ ब्रँड आज चवीचे प्रतीक बनला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि गुरुवर्य राहुल दिघे यांच्या मंगल उपस्थितीने या नव्या शाखेचा प्रारंभ होत असल्याने या ब्रँडच्या प्रगतीला नवे बळ मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आशुतोष निकम यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण सोहळ्याचे वातावरण भक्तिभाव, पारंपरिकता आणि आनंदाने ओतप्रोत भरलेले होते.
राहाता शहरातील या नव्या शाखेमुळे पारंपरिक खाद्यसंस्कृतीला आधुनिकतेचा स्पर्श मिळत असून, स्थानिक व्यावसायिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. ‘जगदाळे वडेवाले’ यांच्या या यशस्वी विस्तारामुळे स्वाद, सेवा आणि स्वदेशी आत्मविश्वासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.