राहूरी : शहाजी दिघे
राहुरी : महिला आर्थिक विकास महामंडळ, अहिल्यानगर संचालित प्रतिभा लोकसंचालीत साधन केंद्र राहुरीद्वारे तालुकास्तरीय भव्य नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनालिताई तनपुरे उपस्थित होत्या. त्यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
लघु उद्योग करणाऱ्या महिलांनी स्टॉल्स लावले होते. त्यां महिलांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणाऱ्या या महिलांना पाहून अभिमान वाटला. या सर्व महिलांच्या मागे खंबीरपणे उभ्या असणाऱ्या पुरुषांचा सन्मान करून एक अनोखा संदेश देण्यात आला.
सौ. श्रीमती .रोहिणीताई कुसमुडे यांचे शेतीविषयीचे ज्ञान आणि त्यांनी त्या क्षेत्रात घेतलेली भरारी स्फूर्तीदायी आहे. सेंद्रिय शेती करत ते आपला शेतमाल परदेशात निर्यात करत आहेत. खरंच, आपल्या भगिनींना असे मोठे होताना पाहून आनंद वाटतोय. या सर्वांच्या व्यावसायिक वाटचालीत माझ्यातर्फे जी मदत करता येईल ती करण्याचा माझा निर्धार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी श्री. संजय गर्जे साहेब, श्रीमती. पुष्पाताई धनवटे, श्रीमती रोहिणीताई कुसमुडे, श्री. महेश अबुज सर, सर्व अधिकारी वर्ग, माझ्या कर्तृत्ववान महिला भगिनी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.