September 11, 2025 8:32 am

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन 

अहिल्यानगर :प्रतिनिधी 

अहिल्यानगर :कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालता बोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांना अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. मी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ आणि खेळाडूंना जोडण्याचं काम केलं. क्रीडा क्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जीवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडा रसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनानं मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें